HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना व्हायरसमुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार

मुंबई। राज्यात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून आता ८ पुणे, २ मुंबई आणि नागपूरमध्ये १ असे ११ रुग्ण अढळून आले आहे. मात्र, राज्यातील कोरोना बाधित रुणांची संख्या स्थिर असून जनतेने घाबरू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१२ मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोना व्हायरसचे सावट आहे. राज्याचे अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होते.कोरोनामुळे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी (१४ मार्च) होणार आहे.

अधिवेशनाबाबत प्रश्न विचारवर मुख्यमंत्र्यांना म्हणाले, “लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघात जाण्याची गरज आहे. याशिवय जे प्रशासन इथे आहे तेदेखील आपापल्या जागी जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना बोलवले होते. अध्यक्ष, सभापती महोदय, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि आणखी सहकारी मंत्री होते. कामकाज अर्धवट ठेवून अधिवेशन संपवण्याचे नाही. तर कामकाज पूर्ण करुन शनिवारी अधिवेशन संपवायचे, जेणेकरुन सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघात जातील आणि कर्तव्य पार पाडतील,” असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार असल्याची माहिती मिळाली असून अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवारी येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या लोके घाबरली आहेत, असे प्रशासनाकडून आणि डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दी होणारे अनेक कार्यक्रम रद्द केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत सुरु असलेले विधीमंडळाचे अधिवेशन देखील आटोपतं घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटलांची ‘ती’ इच्छा पूर्ण होणं कठीण, शरद पवारांचं कुटुंब खूप मोठं !, मुनगंटीवारांचा टोला

News Desk

राज्यात ४५ कोरोना बाधित, तर देशात १६६ रुग्णांची संख्या

swarit

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी

Aprna