HW News Marathi
महाराष्ट्र

गुढीपाडवा शोभायात्रासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत नियमावली जाहीर होणार! – अजित पवार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज (३१ मार्च) ४ वाजता कॅबिनेटची बैठकी होणार आहे. यानंतर गुढीपाडव्याला शोभायात्रा परवानगीसंदर्भात आज संध्याकाळपर्यंत नियमावली जाहीर होईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. या बैठकीत राज्यात कोरोना नियमा हटवण्यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागेल आहेत. 

राज्यात कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे निर्बंध हटवण्यासंदर्भात मागणी होत आहे. राज्यातील टास्क फोर्सकडे ही मागणी पोहोचवत आहोत. आणि त्यानुसार ते निर्णय घेत असतो, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल (२९ मार्च) पत्रकारांशी बोलताना सांगितले. टोपे पुढे म्हणाले, “रेल्वेतून प्रवास करताना लसीकरणांचे दोन डोस निर्बंध कायम ठेवले आहे. तर बस आणि मॉलमधील नियम शिथील करण्याबात टास्क फोर्सची चर्चा करणार आहे. तसेच राज्यात मास्क मुक्ती करण्याचा सध्या तरी विचार नाही, आरोग्यमंत्री म्हणाले. 

 एसटी कर्मचाऱ्यांनी आज कामावर रुजू व्हा नाही तर कठोर निर्णय घेतला जाणार जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. कामावर रुजू न झाल्यास एसटी कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई होईल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “ज्या कर्मचाऱ्यांना काढले आहे. त्या जागी नवीन भरती पण होऊ शकते, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळांमुळे माझा विजय

News Desk

“… साखर आयुक्तांनी आदेश मागं घ्यावा, अन्यथा संघर्ष अटळ”, राजू शेट्टींचा इशारा!

News Desk

विमा कंपन्यांविरोधात शिवसेनेच्या ‘धडक मोर्चा’ला सुरुवात

News Desk