HW News Marathi
Covid-19

विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना पगार न दिल्यास त्यांची मान्यता होणार रद्द !

मुंबई | देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. यानंतर राज्यातील सर्व सरकार आणि खाजगी शाळा बंद करण्यात आल्या. सध्या लॉकडाऊनला दोन महिने होऊन ही राज्यातील काही खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्माचाऱ्यांना नियमित पगार देण्यास उशीर करत आहे, अशा तक्रारी प्रशासनाला मिळाल्या आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शाळा शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देणार नाही, त्या शाळांची मान्यता रद्द करण्याच्या कठोर सूचना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून राज्यातील सरकारी आणि खासगी सर्व शाला बंद आहेत. मात्र, खाजगी विनाअनुदानित शाळांच्या व्यवस्थापनाने शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अद्याप दिलेले नाही. यामुळे शिक्षण मंत्र्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचे ठोस पावले उचलले आहे. खाजगी विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापनाची असल्याची आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परिक्षा कधी होणार ? मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

News Desk

राज्यमंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करून जनतेच्या जीवाशी खेळू नये !

News Desk

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३,४४८ उद्योगांना परवाने

News Desk