HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई | राज्यात कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडू लागले आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने म्युकरमायकोसिसला साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट केलं असून त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत. राज्यभरात म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिलं आकारत असल्याचं निदर्शनास आलं होतं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असा प्रकारांना आळा बसणार आहे.

वर्गवारीनुसार दरआकारणी केली जाणार!

म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

यानुसार…

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

दरम्यान, कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहरं किंवा भाग येतात, यासंदर्भात देखील सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

अ श्रेणी –

मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)

पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी)

नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)

ब श्रेणी – नाशिक (नाशिक महानगर पालिका, एकलहरे, देवळाली कँटोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महानगर पालिका, औरंगाबाद (महानगर पालिका आणि कँटोनमेंट), भिवंडी (महानगरपालिका आणि खोनी), सोलापूर महानगर पालिका, कोल्हापूर (महानगर पालिका आणि गांधीनगर), वसई-विरार महानगर पालिका, मालेगाव (महानगर पालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा), नांदेड महानगर पालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिका, माधवनगर)

क श्रेणी – अ आणि ब गट वगळता सर्व भाग

शस्त्रक्रियांचे दर देखील केले निश्चित!

विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून अ वर्ग शहरांमध्ये त्यासाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये, ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत आणि क वर्गातील शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत दर ठरवून दिले आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वास नांगरे पाटलांना माहिती लपवून ठेवली म्हणून निलंबित करा! – प्रकाश आंबेडकर

Aprna

“…म्हणूनच तुमची इतकी मस्ती आणि चरबी वाढली”, संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

Aprna

बाळासाहेबांनी मला पद दिलं बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून! – नारायण राणे

News Desk