HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaVirus : राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीतीपोटी दवाखाने बंद ठेवू नयेत, आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई | कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यभरातील खासगी डॉकटरांनी दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोनाच्या भीतीपोटी दवाखाने ठेवू नका, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राजेश टोपे यांनी आज (२७ मार्च) फेसबुक लाईव्हच्या राज्यातील जनतेशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात सध्या  ४२२८ जणांच्या कोरोनासाठी चाचण्या केल्या त्यापैंकी ४०१७ चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले, अशी माहिती दिली. तर राज्यातील  कोरोनाबाधितांचा आकडा १३५ वर गेला आहे.

तसेच  संचारबंदीच्या काळात पोलीस आवश्यक ते सहकार्य करतील, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केले आहे. कोरोना व्यतीरिक्तही अन्य आजारांच्या उपाचारांसाठी खासगी रुग्णालये सुरू साहणे आवश्यक आहेत. गरोदर महिला, लहान मुलांचे आजार, हृदयविकाराचे रुग्ण यांना वेळीच उपचाराची गरज असते, असेही राजेश टोपेंनी सांगितले.

दरम्यान, राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्ताची साठवणूक दीर्घकाळ करता येत नाही. केवळ कोरोनच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये , हिमोफेलीयाच्या रुग्णांसाठी रक्ताची गरज असते. अशावेळी सामाजिक संस्थांनी संचारबंदी सूचनांचे पालन करून रक्तदान शिबिरे घ्या,रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश.ही शिबिरे घेताना सोशल डिस्टसिंग पाळण करावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्ण बरे होतात

राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होत असून आतापर्यंत १५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी यांनी येथे दिली. दरम्यान, काल (२६ मार्च) पुण्यात दोन कोरोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Related posts

थोड्याच वेळात शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक

News Desk

पूरग्रस्तांसाठी राज्याचा केंद्राकडे ६००० कोटींच्या मदतीचा प्रस्ताव

News Desk

बीडमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्ताने धनंजय मुंडेंनी ध्वजारोहण करून दिल्या शुभेच्छा

News Desk