HW News Marathi
महाराष्ट्र

आज विधानसभेत OBC आरक्षणाच्या नव्या विधेयकावर होणार चर्चा

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. विधानसभेच्या सभागृहात आज (७ मार्च) ओबीसी आरक्षणावर नवे विधेयक मांडणार असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. ओबीसीआरक्षणाच्या नव्या विधेयकावर होणार चर्चा सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा रंगणार आहे. 

ओबीसी आरक्षणावर सभागृहात मांडण्यापूर्वी महाविकासाघाडीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकासआघाडीचे कॅबिनेट मंत्री विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्या धर्तीवर कायद्यात बदल करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (४ मार्च) म्हणाले. तसेच ११ मार्चला विधानसभेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावरून विरोधक महाविकासाघाडीवर निशाणार साधण्यासाठी तयार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

swarit

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

कुठल्याही प्रकारे बेडची कमतरता भासणार नाही – अजित पवार

News Desk