HW News Marathi
महाराष्ट्र

जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरून धनंजय मुंडे-पंकजा मुंडेमध्ये संघर्ष

बीड | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या बहीण-भावाच्या वादात परळी मधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था स्वर्गीय मुंडेच्या पश्चात जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरून पालकमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यात संघर्ष सुरू आहे. या दोन्ही बहिण भावांमधील संघर्षाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी विधानसभा निवडणुकीत देखील या दोघांमधील संघर्ष टोकाला गेला होता. 

या संस्थेत सुरू असलेल्या वादामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव आणि प्रशासक नेमण्यासाठी ४ जानेवारी रोजी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. ही समिती आपला अहवाल काल (१५ जानेवारी) विद्यापीठाकडे सादर आहे. एक वेळ चौकशी केल्यानंतर १५ जानेवारी नंतर पुन्हा चौकशी करणार आहेत. मुंडे बहीण-भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.राजेभाऊ करपे डॉ. फुलचंद सालामपुरे डॉक्टर प्रतिभा अहिरे या तिघांची समिती नेमली असून ही समिती जवाहर एज्युकेशन सोसायटीतील वादामुळे गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण घडणे,संस्थेतील गैरव्यवस्थापन, अध्यापक नियुक्ती संदर्भातील वाद, अध्यापकांची पदोन्नती वादामुळे निर्माण झाले असे शैक्षणिक वातावरण याची चौकशी करत आहेत. मात्र, यामुळे नेमका कोणता परिणाम या शिक्षण संस्थेवर पडणार हे ही पाहणं तितकच महत्वाचे ठरनार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रसरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करु नये, राष्ट्रवादीने झापलं

News Desk

मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नातून बाहेर या, वास्तव स्विकारा! फडणवीसांना काँग्रेसचा खोचक सल्ला

News Desk

प्लॅस्टर ऑफ पॅरिसवरील केंद्र सरकारने बंदी उठवावी, मुर्तीकारांची राज ठाकरेंकडे मागणी 

News Desk