HW News Marathi
महाराष्ट्र

5 कोटी द्या! नाही तर तुमची बदनामी करेन, धनंजय मुंडेंची महिलेविरोधात तक्रार दाखल

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका महिलेविरोधात खंडणीची मागणी केल्याची तक्रार नोंदवली आहे. धनंजय मुंडेंनी मुंबई मधील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये एका परिचित महिलेने पाच कोटी रुपये किमतीचे दुकानाची मागणी केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. या महिलेने पैसे न दिल्यास समाज माध्यमांमध्ये बलात्कार केल्याचा आरोप करत बदनामी करेन, अशी धमकी दिल्याचे धनंजय मुंडेंनी त्यांच्या तक्रारी म्हटले आहे. 

या महिलेने फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय नंबरवरून फोन करून पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. महिलेने ३ लाख रुपये आणि महागडा मोबाईलची मागणी केली होती. धनंजय मुंडेंनी या महिलेला कुरियरद्वारे हे पाठवल्याची माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. यानंतर त्या महिलेने ५ कोटी रुपयांची मागणी करत तगादा लावला होता. आणि पैसे न दिल्यास बलात्कार केल्याचा आरोप करत बदनामी करण्याची धमकी दिल्याची माहिती धनंजय मुंडेंनी पोलिसांना सांगितली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारला आता ‘हिंदू’ शब्दाचे सुद्धा वावडे- अतुल भातखळकर

News Desk

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

Aprna

शर्मिला ठाकरे कडाडल्या…! म्हणाल्या, राज्य सरकार वादग्रस्त मंत्र्यांना पाठिशी घालतंय…

News Desk