पुणे । राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) यांच्या हस्ते जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी सारंग कोडेलकर, पर्यटन सहसंचालक सुप्रिया करमरकर-दातार, जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस, गट विकास अधिकारी शरदचंद्र माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आदी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री लोढा यांनी सुरुवातीला जुन्नरमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या चबुतऱ्याजवळ महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. ‘शिवजन्मभूमी जुन्नर’ या सेल्फी पॉईंटचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिवकालीन लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या ‘शिवकालिन गाव’चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये तत्कालीन गवताची घरे, लोहारकाम, कैकाडी, कुंभारकाम आदी व्यवसाय, आदिवासी तरपा नृत्य, वासुदेव, गोंधळी परंपरा, दांडपट्टा, तलवारबाजी आदी मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले. या गावामध्ये बनविण्यात आलेली शिवकालीन बाजारपेठ आकर्षण उपस्थितांचे आकर्षण बनून राहिली. यामध्ये मंत्री लोढा यांनी बांबूची टोपली खरेदी केली. यावेळी तसेच http://www.hindaviswarajya.info/ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री लोढा यांनी आदिवासी तरपा नृत्यामध्ये वाद्य हाती घेत फेर धरला.
यानंतर मंत्री लोढा यांनी शरद बुट्टे पाटील क्रीडांगण येथे बचत गट प्रदर्शन, महाशिवआरती कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणी भेट दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.