HW News Marathi
देश / विदेश

पेट्रोल पंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी महिलांचे उद्या राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

मुंबई | सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली आहे.

“दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे भाव गगनाला भिडत असतानाच नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे”, असा थेट आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

“ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे. त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल”, असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. या आंदोलनात अधिकाधिक महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणींनी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तान काय किंवा चीन काय, दोघेही दुतोंडी साप !

News Desk

मुंबईत कोरोनाधितांच्या आकड्यात ‘कृत्रिम’ घट, फडणवीसांचा आरोप

News Desk

राहुल गांधीनी माफी मागावी | रविशंकर प्रसाद

swarit