HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना’च्या जगजागृतीसाठी लावलेली कॉलर ट्यून त्वरीत बंद करा – बाळा नांदगावकर

मुंबई | गेल्या काही महिन्यांपासून कोणालाही फोन लावला की कोरोना संदर्भात जनजागृती करणारी कॉलर ट्यून ऐकू येते. मात्र, आता त्या ट्यूनने त्रास होण्यास सुरुवात झाली आहे. ही‘कोरोना’च्या जनजागृती संदर्भात लावलेली कॉलर ट्यून सतत ऐकून अनेक जण आता त्रस्त झाले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी, अशी मागणी केली आहे.

“कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून दूरसंचार विभागाकडून गेली अनेक महिने कॉलर ट्यूनच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात येत आहे. परंतु आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे व या कॉलर ट्यूनमुळे अनेकदा महत्त्वाचे फोन असले तरी विलंब होतो अथवा लागत नाही” असे नांदगावकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे. “जी काही जनजागृती करायची ती विविध माध्यमातून जाहिरातीद्वारे होतच आहे. त्यामुळे आता ही कॉलर ट्यून त्वरित बंद करावी” अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

सुरुवातीला “आम्हाला रोगाशी लढायचंय, रोग्याशी नाही” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळत होती, तर आता “देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे, तरी आपण गरज नसताना घराबाहेर पडू नये” ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते. काही सेकंद चालणारी ही ट्यून सातत्याने ऐकून आता त्रास होत असल्याच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालू प्रसाद यादव यांना पाच दिवसांचा पॅरोल मंजूर

News Desk

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणातून छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता!

Jui Jadhav

शरद पवार साहेब आधारवड ! भाजपच्या नेत्याच्या ट्विटची चर्चा !

News Desk