HW News Marathi
महाराष्ट्र

‘मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघायचं बंद करा’ नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला!

मुंबई। भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आहेत तुम्ही नाही…”अशा शब्दांत मलिकांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.भाजपच्या कार्यकारणी बैठक मुंबईत पार पडली. यावेळी ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुणीच मुख्यमंत्री मानत नाही, काही मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजता असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवाब मलिक यांनी ट्वीट करून उत्तर दिले आहे.

‘देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहे. देवेन्द्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही’ असं म्हणत मलिक यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. आणि अशातच आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर टोकाची टीका केलीये. एक मुख्यमंत्री आहेत त्यांना इतर कुणी मुख्यमंत्री मानत नाही आणि मंत्री आहे की जे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलायला कुणाला वेळ नाही’, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. आज दादर मध्ये भाजपची कार्याकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेचे बाण सोडले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या आजच्या दिल्लीतील बैठकीवर संजय राऊत म्हणतात…

News Desk

बीडमध्ये राजकीय वातावरण तापले, शिवसंग्रामचे १५० कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

News Desk

“सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी मिळतात” – नितीन गडकरी

News Desk