मुंबई | माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असे निवेदन विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांना दिले आहे. फडणवीसांनी राज्य सरकारविरोधात तक्रार करत जाब विचारण्याची विनंती राज्यपालांना केली. फडणवीसांनी आज (२८ एप्रिल) राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी फडणवीस यांच्या सोबत भाजपचे नेता विनोद तावडे, विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार आशीष शेलार आणि भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढाजी उपस्थित होते.
माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा !
मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांची आज भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी माझे सहकारी विनोद तावडेजी, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढाजी उपस्थित होते. pic.twitter.com/VJMfWc6a7h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 28, 2020
राज्यपालांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाधवान प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी सरकारने दिलेलं पत्र सार्वजनिक केल्याने काही दिवसांतच वांद्र्यातील गर्दीचा ठपका ठेऊन त्यांना अटक करण्यात आली. मुंबईत हा गुन्हा नोंदवण्यात आला असल्याने अनेक संवेदनशील क्षेत्रातून प्रवास करुन उस्मानाबाद येथून मुंबईत आणण्यात आले. त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर हा संपूर्ण प्रसंग त्यांनी स्वत:च कथन केला आहे, असे सांगण्यात आले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.