HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

कांदा निर्यातबंदीने देशाच्या प्रतिमेला धक्का बसेल- शरद पवार  

sharad pawar on koregoan bhima issue

मुंबई | केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली असून यामुळे शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक आंदोलनाच्या तयारीत आहेत. अशातच शरद पवारांनी आज (१५ सप्टेंबर) पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी निर्यात होणाऱ्या कांद्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली मागणी आहे आणि आपण सातत्याने कांदा निर्यात करत आलो आहोत. पण केंद्र सरकारच्या अशा आकस्मिक निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा एक खात्रीशीर निर्यातदार देश म्हणून भारताची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेला मोठा धक्का बसतो याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांना करून दिली आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्यातबंदी लागू केली आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘केंद्रसरकारने आकस्मिकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केली. त्यावर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक बेल्टमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सोमवारी रात्री संपर्क करून केंद्रसरकारला या प्रतिक्रियेबाबत अवगत करण्याची विनंती केली आहे.’

आज शरद पवार यांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांची परिस्थिती मांडली. या बैठकीत प्रामुख्याने कांदा उत्पादक जिरायत शेतकरी आहे. त्याचप्रमाणे हा बहुसंख्य शेतकरी अल्पभूधारक आहे हा मुद्दादेखील पवारांनी गोयल यांच्यासमोर मांडला. तसेच ‘या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात भारत हा निर्यातीच्या बाबतीत एक बेभरवशाचा देश आहे अशी प्रतिमा बनण्याची शक्यता बळावते. ती आपल्याला परवडणारी नाही. या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना मिळतो.’ , असेही शरद पवार यांनी पियुष गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Related posts

ठाकरेंचा मोदींना पाठिंबा

News Desk

कतार ‘ओपेक’मधून बाहेर पडणार

News Desk

द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या पुतळ्याची विटंबना,डोक्यावर ठेवले चप्पल

News Desk