HW News Marathi
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस कडक लॉकडाऊनचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव पुण्यापासून झाला. पण काही दिवसांनंतर पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला. पण, पुन्हा काही दिवसांनी या आकड्याने भरारी घेतली ती आता थांबतच नाही आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोनाचे अनेक रुग्ण आढळल्याने या भागात ८ दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही परिस्थितीत या भागातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढू न देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. तसेच, पोलिस, प्रशासनाला लागेल ती मदत करण्याची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखवली आहे. तसेच, पोलिसांना जी कडक अंमलबजावणी लॉकडाऊनसाठी करावी लागेल ती करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आज (१८ एप्रिल) आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना व करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती जाणून घेतली.

या बैठकीला राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बीष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थित होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही आमचा अपमान करत आहात”, संजय राऊतांचा राज्यपालांच्या भूमिकेवर आक्षेप!

News Desk

महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी?

News Desk

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप गंमत बघत बसले, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

News Desk