HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!

बीड | नीट परीक्षेत कमी गुण मिळाले त्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. आता पुढे शिक्षणाची वाट कठीण झाल्यामुळे एका १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (३० सप्टेंबर) घडली. विवेक राहाडे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विवेक याने नुकतीच नीट परीक्षा दिली होती. मात्र, विवेकला परीक्षेत कमी गुण मिळतील असे वाटत होते. याच नैराश्यातून विवेकने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने पुढच्या शिक्षणाची वाट कठीण झाल्याने विवेकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालं असतं तर विवेकचा नंबर लागला असता, अशी भावना विवेकच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

Aprna

अनेक आंदोलनाचा साक्षी असलेल्या लिंबाच्या झाडाचा अखेर अंत!

News Desk

दोन्ही समाजाने शांतता राखावीः शरद पवार यांचे निवदेन

News Desk