HW News Marathi
महाराष्ट्र

तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे “तीन तेरा”

मुंबई | राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचे आदेश दिले असताना शहरातील बहुसंख्य शाळांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू होऊन काही महिने उलटले आहे. कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने पालकवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबईतील अनेक शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते आहेत. कुर्ला परिसरातील सीएसटी रोडवरील अंजुमन-ए-इस्लाम उर्दू शाळा, न्यू मिल रोड कुर्ला येथील संभाजी मनपा हिंदी शाळा, संत गाडगे महाराज लेन येथील श्री गाडगे महाराज विद्यालय कुर्ला पश्चिम, तसेच विक्रोळी पश्चिमेला स्टेशन लगत असलेली सेंट जोसेफ हायस्कूल विक्रोळी अश्या अनेक मुंबईतील शाळा कॉलेज यांच्या जवळील परिसरात सर्रास विक्री सुरू आहे.

तर शाळेमध्ये प्रतिबंधात्मक फलकही या ठिकाणी पाहायला मिळत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावेळी एच. डब्ल्यूच्या प्रतिनिधीने संबंधित शाळेतील मुख्यधपकांशी चर्चा केली असता, ही बाब आमच्या देखील लक्षात आहे. आमच्याकडे देखील शासन परिपत्रक आहे. तसेच या गोष्टीची तात्काळ तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करू आणि परिसरातील या पान टपऱ्या बंद करू, तर शाळेमध्ये दरवर्षी व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्री गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक गोडे एस. के. यांनी सांगितले.

तंबाखू नियंत्रण कायदा २००३ मधील कलम सहा(ब) मध्ये केलेल्या तरतुदीनुसार राज्यातील शैक्षणिक संस्थापासूनच्या १०० मीटर पणरसरात तंबाखू णवक्रीस बंदी आहे व तसे शाळेच्या प्रवेशद्वारावर फलक लावणे बंधनकारक आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी केंद्र सरकारने तंबाखूच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी सिगारेट व तंबाखूजन्य नियंत्रण कायदा २०१३ तयार केला. याच कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २०१५ मध्ये राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी स्वतंत्र आदेश काढला आहे.

या आदेशानुसार परिसरामध्ये तंबाखू विरहित वातावरण तयार करण्याची जबाबदारी शाळांवर टाकण्यात आली आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनावर, सिगारेट फुंकण्यावर बंदी, शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर प्रतिबंध, तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या १०५ आमदारांमध्ये शिवसेनेचं योगदान मोठं, शिवसेनेशिवाय भाजपचे ४०-५० आमदार असते…

News Desk

“मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ”- शरद पवार

News Desk

गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून काढून घ्या, कुटुंबियांनी उच्च न्यायालयाकडे मागणी

News Desk