HW News Marathi
महाराष्ट्र

कोलंबकरांना अनेक जण ‘हे बंधन बांधा, ते बंधन बांधा’ सांगत होते !

मुंबई | “कालिदास कोळंबकर बऱ्याच दिवसांपासून मला विचारत होते कि, माझ्या पक्षप्रवेशाचे काय ? कारण, अनेक जण त्यांना ‘हे बंधन बांधा, ते बंधन बांधा’ असे सांगत होते. मात्र, आता अखेर कोळंबकर याचा भाजपप्रवेश झाला आहे. कोळंबकर यांची खरी जागा भाजपमध्येच आहे”, असे म्हणत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलाच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज (३१ जुलै) मुंबईतील गरवारे क्लब येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ त्याचप्रमाणे काँग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

काहीच दिवसांपूर्वी कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये नव्हे तर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. यापूर्वी कालिदास कोळंबकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर कोळंबकर हे भाजपमध्ये नव्हे तर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, कालिदास कोळंबकर यांच्या वडाळा कार्यालयाच्या बॅनरवर यापूर्वी काँग्रेस नेत्यांऐवजी मुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो असल्याचे देखील निदर्शनास आले होते. त्याचप्रमाणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला देखील ते उपस्थित होते. तसेच आज अखेर कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद, आज कोणता बॉम्ब फुटणार?

News Desk

पक्षासाठी आयुष्य वेचलेले सत्ते बाहेर तर राणें सारखे मंत्री कसे होतात ?

News Desk

…तरच स्वतंत्र राजकिय पक्षाचा विचार केला जाईल- संभाजीराजे छत्रपती

News Desk