HW News Marathi
महाराष्ट्र

शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे भाजपमध्येच राहतील, मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्या मुळे मुंडे भगिनी नाराज आहेत अश्या चर्चांना उधाण आलं होतं.

भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी बैठक घेऊन त्या नाराज नसून त्यांचा कोणावर वैयक्तिक राग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यात आता, ओबीसी मोर्चाच्या बैठकीस पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती दिसल्याने, नव्या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे.

पंकजा मुंडे या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही

पंकजा मुंडे या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित नसल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सुधीर मुनगंटीवार या वर म्हणाले, “कार्यकर्ते जे पक्षावरही प्रेम करतात व कधीकधी पक्षातील विशिष्ट नेत्यावर इतर नेत्यांच्या तुलनेत थोडं जास्त प्रेम करतात. तर, अशा काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, हा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना समजावताना काही शब्दांचा उपयोग केला असेल, पण त्याचा अर्थ त्या नाराज आहेत असं मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत पंकजा मुंडे या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नाही. असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

नेमकं प्रकरण काय होतं?

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.. यात महाराष्ट्रातील काही अपेक्षित नावांना संधी मिळाली तर काही अनपेक्षित.. केंद्राच्या या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा जोरदार होती.. त्या आधी दिल्लीत गेल्याचंही वृत्त समोर आलं होतं.. मात्र, त्यांच्या जागी भागवत कराडांना केंद्रात जागा मिळाली आणि मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली.. यामुळे मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र सुरुच आहे.. पदाधिकाऱ्यांनी बीड, अहमदनगरमध्ये आपले राजीनामे दिल्याने महत्वांच्या कार्यकर्त्यांशी भाजप नेत्या पंकजा मुंडे उद्या बातचीत करणार आहेत.. अशात काल अचानक पंकजा मुंडे दिल्लीत गेल्याने खळबळ उडाली.. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची त्यांनी भेट घेतली आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही त्यांनी भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिका कर्मचारी व शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांच्यासह आरोग्य सेविकांना दिवाळी बोनस जाहीर

Aprna

महाराष्ट्र निवडणूक आयोगाद्वारे भाजपाच्या सोशल मिडिया कंपनीचा वापर ? पृथ्वीराज चव्हाण

News Desk

कौशल्य प्रशिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी दर २ महिन्यांनी संस्थांचा जनता दरबार! – मंगलप्रभात लोढा

Aprna