HW News Marathi
महाराष्ट्र

“…तर जावेद अख्तरना तालिबाननं चौकात फटके मारले असते”, सुधीर मुनगंटीवारांचा जावेद अख्तरांवर हल्ला

मुंबई | प्रसिद्ध कवी जावेद अख्तर हे सध्या चर्चेत आहेत. “जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते..” असं विधान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात सध्या भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. या वक्तव्याबद्दल जावेद अख्तर यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे. शिवाय, भाजपाच्या काही नेत्यांनी जावेद अख्तर यांना थेट अल्टिमेटही दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील जावेद अख्तर यांच्यावर टीका केली आहे.

काय आहे ट्विट?

“मला असं वाटत हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. हेच वाक्य तालिबानमध्ये जाऊन, त्यांनी अशा पद्धतीचं एखादं वाक्य वापरलं असतं तर चौकात त्यांना तालिबानी लोकांनी फटके मारले असते.” असं सुधीर मुनगंटीवार एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

“या ठिकाणी जर या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसं अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होता हे तुम्ही पाहिलं असेल. तसे हाल इथं झाले नसते? पण इथे त्यांच्या या वक्तव्याची काही लोकांनी, मीडियामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर नोंद घेतली. याचा अर्थ इथे देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत”.

“बजरंग दलाबद्दल नाव घेताना, त्यांच्या मनात बजरंग किंवा राम भक्ताबद्दलची जी काही असुया आहे, ती अप्रत्यक्ष व्यक्त झाली. अशी कोणतीही घटना देशात झाली नाही. त्यांच्या घरावर कुणी लोक गेले नाहीत किंवा केंद्राने पोलीस पाठवले नाहीत. त्यांना अटक करत ५०५(२)चा गैरवापर केला नाही.” असंदेखील मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं आहे”.

काय म्हणाले अख्तर?

तालिबान बनण्याची पूर्ण ड्रेस रिहर्सल

एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते रानटी आहेत पण ….

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे’.

भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले

अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाने व्यक्त केलेल्या आनंद आणि इस्तकबालावर जावेद अख्तर म्हणाले की, अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. ते म्हणाले की हे फ्रिंज आहेत, बहुतेक भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले आहेत.

हे लोक हिंदू राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न

जगभरातील राईट विंगमधील समानतेकडे लक्ष वेधून अख्तर म्हणाले, ‘मुस्लिम राईट विंग असो, ख्रिश्चन राईट विंग असो किंवा हिंदू राईट विंग असो, जगभरात त्यांच्यामध्ये एक समानता आहे. तालिबानला जे हवे आहे, ते म्हणजे इस्लामिक देश निर्माण करणे आणि हे लोक हिंदू राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की, परंपरेपेक्षा जे वेगळे आहे ते स्वीकारता येत नाही. या लोकांना असेही वाटते की कोणत्याही मुलगा आणि मुलीने एकत्र पार्कमध्ये जाऊ नये. फरक एवढाच की, हे तालिबानी इतके शक्तिशाली झाले नाहीत. पण त्यांचा हेतू तालिबानसारखाच आहे.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय, शरद पवारांकडून कानपिचक्या

News Desk

अध्यादेश परत पाठवण्यामागे ओबीसी आरक्षण घालवण्याचं सल्लागारांचं कटकारस्थान; विजय वडेट्टीवारांचा आरोप!

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या वडिलांना ‘कृषीरत्न पुरस्कार’ जाहीर, मुलाने ‘असं’ केलं अभिनंदन

News Desk