HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची ‘मी जबाबदार’ घोषणा पण वाढत्या कोरोनाला जबाबदार कोण?- सुधीर मुनगंटीवार

मुंबई | भाजप नेते सुधीर मुनगंटीवा यांनी कोरोना, आरोग्य सुविधा, नोकरभरती, संजय राठोड प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री वाढत्या कोरोनावर चिंता व्यक्त करत मी जबाबदार ही नवी घोषणा केली पण वाढत्या कोरोनाला कोण जबाबदार, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. सामान्य जनता जबाबदारीने वागत असते. मंत्री मोर्चे काढतात, वाढदिवस साजरे करतात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली पाहिजे. कोरोनाशी लढण्याचा ठोस कार्यक्रम आखला पाहिजे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. कोरोना सारखं संकट असूनही राज्य सरकारनं आरोग्य खात्याचं बजेट वाढवलं नाही. राज्य सरकारनं ४ मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, त्यांनी तेव्हापासून काहीच पावलं उचलली नाहीत. हे सरकार मे २०२० पासून नोकरभरती करु शकलं नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपला जडला महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग!

News Desk

सुशांत सिंहच्या आत्महत्येबद्दल कंगना राणावतचे आदित्य ठाकरेंसाठी काही प्रश्न

News Desk

नांदेडच्या महापाैर शैलजा स्वामी यांनी ” नो व्हेईकल डे “अॅटोरिक्षातून साजरा केला

News Desk