HW Marathi
महाराष्ट्र

साखर कारखान्याच्या अध्यक्षांची गोळी झाडून आत्महत्या

भवानीनगर | छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप केशवराव निंबाळकर (वय ४५) यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  निंबाळकर यांची ३१ आॅक्टोबरला छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. निंबाळकर यांना गंभीर जखमी अवस्थेत बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,  इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली.

दरम्यान, निंबाळकर राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर होते. अचानक गोळीच्या आवाज आल्याने  घरातील सदस्यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर तातडीने त्यांना बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ऐन दिवाळीमध्येच निंबाळकर यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने सणसर गावावर शोककळा पसरली आहे. निंबाळकर यांचा मृतदेह रूई येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आला.

Related posts

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

भोकर तालुक्यातील शेतकऱ्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्त्या   

News Desk

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk