HW News Marathi
महाराष्ट्र

सुजय विखे-बाळासाहेब थोरात यांच्या एकत्र विमान प्रवासामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

अहमदनगर | राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजप खासदार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनी आज (१५ जुलै) एकाच विमानाने दिल्लीचा प्रवास केला आहे. या प्रवासदरम्यान दोघांनमध्ये नमके काय चर्चा झाली हे अद्याप समजले नाही. या दोघांनी शिर्डी येथून सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास स्पाईट जेटच्या विमानात बिझनेस क्लासमध्ये दोघांनाही योगायोगाने शेजारी जागा मिळाली.

थोरात प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्ली निघाले होते. सुजय विखे हे आधिवेशनासाठी दिल्लीला जात होते. तेव्हा दोघांनी एका विमानातून प्रवास केला. सुजय विखे यांनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघातील १२ जिल्ह्यात कमळ फुलविण्याची घोषणा केली आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांचीच निवड झाल्यामुळे विखे – थोरात यांच्यातील वाद अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विमानातील योगायोगाच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंच्या राष्ट्रवादीच्या येण्याच्या निर्णयावर अजित पवार नाराज ?

News Desk

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होण्याची शक्यता

News Desk

ग्रामसेवकावर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी

News Desk