HW News Marathi
महाराष्ट्र

“नगरबाहेरच्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही”, रेमडेसिवीर वादावर सुजय विखे-पाटलांचे वक्तव्य

अहमदनगर | दिल्लीतून नगर जिल्ह्यासाठी परस्पर रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन आल्यामुळे वादाच्या आणि टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. “या संपूर्ण प्रकरणात मी नगर जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बांधील नाही. जनतेने निवडून दिलेल्यान नगरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्यांना सर्व पुरावे देईन”, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.

आज (२७ एप्रिल) ते अहदनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सुजय विखे-पाटील यांनी परस्पर रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करुन आणल्यामुळे उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सुजय विखे-पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा आहे. यावेळी त्यांनी असं म्हटले की, “मी किती रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करुन आणली याचा उल्लेख केलेला नाही. मला यावर राजकारण करायचे नाही. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यातील जनतेशी आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उत्तर देण्यास बंधनकारक नाही”, असे सुजय विखे-पाटील यांनी म्हटले.

नगर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने प्रश्न उपस्थित केला का?

“नगर जिल्ह्यात १२ आमदार आहेत. एकाही आमदाराने या सगळ्याविषयी फसवेगिरीचा प्रश्न उपस्थित केला आहे का? त्यांना हा स्टंट वाटत असेल तर मी त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने मला प्रश्न विचारला तर मी त्याला सर्व पुरावे देईन. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला तर माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्यापासून आमचे कुटुंब जिल्ह्यात कार्यरत आहे. जनतेने कधीही आमची साथ सोडलेली नाही. मी कारवाईला घाबरत नाही. आमच्याकडे सर्व पुरावे आहेत”, असे सुजय विखे-पाटील यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयुक्त संजय पांडे यांचा हस्ते पात्र सहायक पोलीस उप निरीक्षकांना पदोन्नती

Aprna

महावसुली आघाडी सरकारच्या काळातील राजकारणाचे गुन्हेगारीकरण चिंताजनक 

News Desk

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !

News Desk