HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांचा संजय राऊतांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश

नाशिक | नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते आणि सुनील बागुल यांनी आज (८ जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

गिते आणि बागुल यांनी दोनच दिवसांपूर्वी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल रात्री त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली होती. दरम्यान, २ दिवसांपूर्वीच माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आणि आता भाजपमधील २ नेते शिवसेनेत गेल्याने नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा – पंकजा मुंडे

News Desk

“शिवसेना “युपीए”मध्ये आल्यास आश्चर्य वाटणार नाही”, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य!

News Desk

…म्हणून नारायण राणेंनी भाजपमध्ये पळ काढला, शिवसेनेच्या आमदाराचा गौप्यस्फोट

News Desk