HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई- गोवा हायवेची कायमस्वरूपी दुरुस्ती, सुनील तटकरेंनी दिली माहिती

मुंबई | कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे सगळे रस्ते खचले असून काही वाहूनही गेले आहेत. याचा कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि मुंबई – गोवा महामार्ग देखील दुरुस्त व्हावा या साठी राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे. या भेटीची माहित आणि कारण

त्यांनी ट्विट करून दिली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथले रस्ते खचले आहेत. सप्टेंबर मध्ये गणेशोत्सव आहे आणि मुंबईहून अनेक लोकं कोकणात येतात. त्याच्या आधी रस्ते दुरुस्तीचं काम झालं पाहिजे म्हणून सुनील तटकरेंनी नितीन गडकरींची भेट घेतली.’ केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री मा. नितीन गडकरी यांची भेट घेऊन रायगड-रत्नागिरी मधील काही महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीबाबत मागणी केली. भविष्यात दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पुलांचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट आवश्यक असल्याचे सांगितले’, ही माहिती त्यांनी ट्विट द्वारे दिली आहे.

राज्य सरकारकडून मदत जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्ज्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरग्रस्थांना मदत जाहीर करण्याच्या चर्चा सरकार कडून येत होत्या पण आज(३ ऑगस्ट) त्यावर अंबलबजावणी झाली आहे. अतीवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयातील ‘त्या’ बैठकीला अजित पवारांनी पुण्याच्या महापौरांना का डावललं?

News Desk

#CoronaVirus : दिलासादायक बातमी ! ५ जणांना डिस्चार्ज देण्याची शक्यता, राजेश टोपे

swarit

अनिल परब २ महिन्यांचे पाहुणे, किरीट सोमय्यांचा दावा

News Desk