HW News Marathi
महाराष्ट्र

सुनील तटकरेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’

मुंबई – सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यातील खड्ड्यावरून राजकारण तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्ड्याचे सेल्फी काढून सरकारलाच उघडे पाडले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ‘खड्डे दाखवा’ आणि हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. खर तर, चंद्रकांतदादा यांनीच राज्यात एखादा खड्डेमुक्त रस्ता दाखवावा आणि हजार रुपये मिळवावेत. राज्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी काल सेल्फी विथ खड्डा अभियानांतर्गत खड्ड्यासोबत फोटो शेअर केला होता. मी आज रायगड जिल्ह्यातील दिघी-पुणे राज्य महामार्गावरील खड्ड्यांचा फोटो पोस्ट करत आहे. राज्यातील रस्त्यांच्या अवस्थेचे वास्तव या अभियानातून समोर येत आहे. आता तरी सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार का? असा सवाल तटकरे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर

News Desk

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk

‘चोरी की है तो कबूल करना पडेगा’; अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील IT छाप्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

News Desk