HW News Marathi
महाराष्ट्र

सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

मुंबई । सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी २९ जून 2022 पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.

या हरकती किंवा सूचना २९ जून, २०२२ अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ यांच्याकडे टपालाद्वारे अथवा dycomm inspection@mah.gov.in या ई-मेल वर नोंदविण्यात याव्यात. यासंदर्भातील अधिसूचनेचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ http://stateexcise.maharashtra.gov.in येथे तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उत्तर प्रदेशात स्कूल व्हॅनला ट्रेनच्या धडकेत १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

News Desk

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा

News Desk

‘राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही’, भास्कर जाधवांचा इशारा

News Desk