HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावतीत पालिका आयुक्तांच्या अंगावर शाईफेक; पोलिसांनी ४ जणांना घेतलं ताब्यात

मुंबई |  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरुन अमरावतीमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता. तेव्हा अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर आज (९ फेब्रुवारी) शाईफेकून निषेध नोंदविला. पण, आयुक्तांच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान राखत धावून आले. या प्रकरणी ४ जणांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. 

अमरावतीच्या पालिका कार्यलयाच्या प्रंगणात आयुक्तांना आज (९ फेब्रुवारी) दुपारी पालिका अधिकारी कचऱ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा रवी राणांच्या समर्थकांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेकण्याचा प्रकार केला आहे. तेव्हा एका महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या पिशव्यातील बॉटल काढून आयुक्तांच्या अंगावर फेकले. त्यावेळी आयुक्तांच्या बचाव करण्यासाठी पुढे आला. या कार्यकर्त्यांनी जय भवानी, जय शिवाजीचे नारे दिले. रवी राणांच्या समर्थकांनी आयुक्तांवर फेकण्यात आलेली प्रकरण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. 

अमरावतीच्या राजापेठ येथील उड्डाण पुलावर पुलावर छत्रपती शिवाजी महारांजाचा पुतळा आमदार रवी राणा यांनी बसवला होता. यानंतर महाराजांचा पुतळा विना परवानगी लावण्यात आल्यामुळे पालिकेने तो हटविला होता. त्यावेळी पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. यानंतर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस व एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा ;राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी

Aprna

आरेतील वृक्षतोडीला तुर्तास स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

News Desk

“संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा” – चंद्रकांत पाटील

News Desk