मुंबई | ज्ञानवापी मशिदी प्रकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयात हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचे सहकारी ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांची प्रकृती ठीक नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर न्यायमुर्ती चंद्रचूड यांनी खंडपीठातील यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी उद्या (२० मे) पुढे ढकलली असून या प्रकरणाची सुनावणी उद्या दुपारी ३ वाजता होणार आहे. तोपर्यंत वाराणसी न्यायालयाने कोणताही निर्णय देऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
Vishnu Shankar Jain, advocate of the Hindu side, tells Supreme Court that senior advocate Hari Shankar Jain is not well and requests it to hear the Gyanvapi Mosque issue tomorrow. pic.twitter.com/PGcq8VCYkq
— ANI (@ANI) May 19, 2022
दरम्यान, या प्रकरणाचा सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. वाराणसी न्यायालयाच्या आदेशानुसार ६ मे आणि ७ मेला सर्वेक्षण करण्यात आले आहे. याुसार उत्तर ते पश्चिम भितींवर जुन्या मंदिरांचे अवशेष आढळून आल्याची माहिती मिश्रांनी अहवालात नमूद केली आहे. यात उत्तर ते पश्मिचने चालत गेल्यास त्यांच्या मध्यभागी शेषनागासारखी एक कलाकृती दिसून येते, असेही अहवालात नमूद केले आहे.
Supreme Court asks trial court in Varanasi not to proceed with the Gyanvapi Mosque case till Friday, 20th May.
— ANI (@ANI) May 19, 2022
यापूर्वी न्यायालयाने कथित शिवलिंग सापडलेल्या भाग संरक्षित करण्याचे निर्देश दिले असून सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यानुसार मशिदीत कोणत्याही अडचणीशिवाय नमाज अदा करू शकतात. या प्रकरणातील सर्वेक्षण प्रार्थनास्थळ कायदा १९९१ मधील करण्यात आलेल्या तरतुदींचे उल्लंघन करण्यात आलेल्याचा दावा, अशी याचिकेत केले होते. यानंतर हिंदू संघटनेने यात हस्तक्षेप करत एक याचिका दाखल करून मशीद व्यवस्थापन समितीची याचिका फेटाळण्याची मागणी केली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.