नवी दिल्ली | निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना एकत्रित फाशी देणार, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी (५ फेब्रुवारी) दिला होता. मात्र, न्यायालयाच्या त्रिसदस्यीय घटनापीठासमोर केंद्राच्या याचिकेवर आज (७ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली. त्यावेळी घटनापीठाने याचिकेवरील सुनावणी ११ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
Supreme Court posts for February 11 the appeal of Central government against Delhi High Court’s order rejecting its plea to separately execute the death row convicts in the December 2012 Delhi gang-rape case. https://t.co/dWHW7J81dC
— ANI (@ANI) February 7, 2020
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रमण, न्या. संजीव खन्ना, न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर हे अपील दाखल करण्यात आले आहे. नटराज यांनी सांगितले की, दोषी व्यक्तींनी केलेल्या पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या दोषींनी केलेले क्युरेटिव्ह तसेच दयेचे अर्जही फेटाळले गेले आहेत. असे असूनही फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणे तिहार तुरुंगाधिकाऱ्यांना अशक्य झाले आहे.
Asha Devi, mother of the 2012 Delhi gang-rape victim: Today, the Court had the power and we had time. Nothing was pending, yet death warrant has not been issued. It's injustice to us, I will see till when the Court gives time to the accused and Government supports them. https://t.co/6HvsXu9t1C pic.twitter.com/nOMuwmC6ls
— ANI (@ANI) February 7, 2020
“निर्भया प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी कोणत्याही औपचारीकता आता बाकी नाहीत. तरी देखील न्यायालयाने डेथ वॉरंट जारी करण्यात केले नाही. हा आमच्यावर अन्याय आहे. आता न्यायालयानेही आरोपींना आणखी किती वेळ देणार आहे? सरकारचा या सगळ्याला पाठिंबा आहे का? ” असे सवाल निर्भयाची आई आशादेवीने उपस्थित केले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.