नवी दिल्ली | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी १७ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश तसेच नोकऱ्यांममध्ये मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (५ फेब्रुवारी) सुनावणी पार पडली. सुनाणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने सर्वोच्च न्यायालयात गोंधळ झाला होता.
Supreme Court says it will start from March 17 the final hearing of the petitions challenging the constitutional validity of a Maharashtra law that grants reservation to the Maratha community in education and jobs. pic.twitter.com/aZHNeJlDIz
— ANI (@ANI) February 5, 2020
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया सुरू करावयाची असल्याने त्यात मराठा आरक्षण लागू करावयाचे किंवा नाही, या मुद्दय़ावर अंतरिम आदेशावर दाखल केलेल्या याचिकेवर नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे आज (५ फेब्रुवारी) सुनावणी ठेवण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपासून मराठा आरक्षणासंबंधी सुनावणीला सुरुवात करत याचिका निकाली काढणार असल्याचे सांगितले आहे.
शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला महाराष्ट्र सरकारने १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. अगोदर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज झाली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.