HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवारांच्या आदेशाने कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन!

पुणे। पुण्यातील आंबील ओढ्याच्या प्रकरणात कारवाई झाल्यानंतर आता या प्रकरणात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील उडी घेतली आहे. अजित पवार यांच्या आदेशाने ही कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, मी तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

आज (२८जून) पुणे महापालिकेच्या गेटवर आंदोलन करत असलेल्या आंबील ओढ्याच्या कारवाईत बाधित झालेल्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. सुमारे तासभर सुप्रिया सुळे या रस्त्यावर या बाधित कुटुंबीयांच्या सोबत जमिनीवर खाली बसल्या होत्या. ‘तुमच्यावर झालेल्या कारवाईबद्दल ज्यांना कुणाला जाब विचारायचा असेल त्यांच्याकडे आपण तुमच्या सोबत येऊ’ असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. मात्र, कुटुंबीयांनी आक्रमक होत सुप्रिया सुळे यांच्यासमोर थेट अजित पवार यांचं नाव घेऊन आरोप केला.

बांधकाम व्यावसायिक केदार असोसिएट यांची आयुक्तांसोबत बैठक झाली होती. अजित पवार यांच्या आदेशाने आमच्यावर ही कारवाई झाली असल्याची तक्रार कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. त्यानंतर मात्र, सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आणि ‘जर या प्रकरणातले पुरावे तुमच्याकडे असतील तर ते मला द्या तुमच्या वतीने मी त्याची तक्रार करेन’ अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली त्यानंतर मात्र सगळ्यांना नवलच वाटू लागले.

या कुटुंबीयांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी थेट आयुक्तांशी चर्चा करत या प्रकरणाची बैठक लावली. आंबील ओढाबाधित कुटुंबीयांना बैठकीसाठी महापालिका आयुक्त यांच्या दालनात बोलावले मात्र या नागरिकांनी येण्यास नकार दिला. तरीही संबंधित प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी आयुक्त विक्रम कुमार यांची जवळपास अर्धा तास भेट घेऊन चर्चा केली आणि आता त्यानंतर या नागरिकांवर कुठलीही कारवाई होणार नाही, असे आश्वासन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं दिवसभराच्या सुप्रिया सुळे यांच्या महापालिकेतल्या हजेरीमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB विरोधात खळबळजनक दावे; मलिक म्हणाले, “मी आता…”

News Desk

“फडणवीसजी काय राव तुम्ही तुमच्यामुळे मुख्यमंत्र्यांना पण घराबाहेर यावं लागतं”, चित्रा वाघ यांचा टोमणा

News Desk

ड्रग्स रॅकेट उघड करणे हा माझा गुन्हा ठरला – कंगना राणावत

News Desk