HW News Marathi
महाराष्ट्र

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना युपी पोलिसांकडून धक्काबुक्की;खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला निषेध…

मुंबई | कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक असून या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर निषेध केला आहे.

कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे…बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य आणि कॉंग्रेसचे नेते असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्याठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे असा सवाल खासदार सुप्रियाताई सुळे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे करचुकवेगिरी रोखावी! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

BSNLच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालयाने केल्या रद्द

News Desk

ताज हॉटेलमध्ये दहशतवादी घुसल्याचा फोन, मुलाची गंमत, पोलिसांची धावपळ

News Desk