HW News Marathi
महाराष्ट्र

अमृता फडणवीसांना ‘मुंबई असुरक्षित वाटते ‘तर सुप्रिया सुळेंना ‘मुंबई पोलिसांमुळे मुंबई सुरक्षित’ वाटते !

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईत गेले काही महिने कोरोना विषाणूचा संसर्ग तर आहेच मात्र गेले २ दिवस मुंबईत तुफान पाऊस सुरू आहे. मुंबई पोलीस कोरोनाच्या संकट काळात देखील अहोरात्र काम करत होते. आणि आता पावसात देखील आपली कामगिरी चोख बजावत आहेत. त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुजरा केला आहे.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी २ दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून मुंबईत राहणे असुरक्षित आहे असे बोलत मुंबई पोलिसांच्या कामावर अविश्वास दाखवला होता. त्यांच्या या ट्विटमुळे अनेकांनी त्यांच्यावर पलटवार केला. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत मुंबई पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत असे ट्विट करत अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे की , आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच.तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट”, काल (५ ऑगस्ट) मुंबईत झालेल्या तुफान पावसामुळे अनेक भागात पाणी भरले होते. सेंट्रल रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्याने लोकांना एनडीआरएफ यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान संवेदनशील, पण मी विरोधी पक्षनेत्यासारखं वैफल्यग्रस्त नाही, मुख्यमंत्र्याचा फडणवीसांवर पलटवार

News Desk

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट १५ एप्रिलपासून होणार सुरु

News Desk

आपल घरं का सोडायचं ? पंकजांच्या भाजप सोडण्याच्या चर्चांना पुर्णविराम !

News Desk