HW News Marathi
महाराष्ट्र

#SushantSinghRajput : आज महाराष्ट्र सरकारला झटका मिळणार आणि सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळणार – राम कदम

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी म्हणून चर्चेत असणाऱ्या रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज (१९ ऑगस्ट)) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. या प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका रीयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आज ११ च्या सुमारास सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयानंतर सदर प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसच करणार की सीबीआय हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, यावर भाजप नेते राम कदम यांनी एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी “आज सुशांत सिंह राजपूत प्रकरणी महाराष्ट्र सरकारला जोरदार झटका मिळणार. लोकांच्या भावनांचा विजय होणार आणि सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळणार”, असे ट्विट करत त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे.

 

१४ जूनला वयाच्या ३४ व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळंच झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. किंबहुना याप्रकरणी विविध अंगानं तपासही करण्यात येत आहे. दरम्यान, हा तपास सुरु असतानाच रियाच्या अडचणी वाढल्या, ज्यावेळी सुशांतच्या वडिलांनी तिच्यासह तिच्या कुटुंबीयांवरही फसवणुक आणि सुशांतचा मानसिक छळ केल्याप्रकरणीचे गंभीर आरोप केले. इतकंच नव्हे, तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक आरोपही त्यांनी केला.

सुशांत्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर रिया आणि इतर काही जणांवर भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणीच्या सुनावणीदरम्यान, रियानं सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. याप्रकरणीचा तपास सीबीआयच्या हाती सोपवण्याचा राज्याला अधिकार नसल्याची बाब उचलून धरली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

News Desk

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत, सचिन सावंतांनी भाजपवर साधला निशाणा!

News Desk

औरंगाबादेत शिवसेनेचा महापौर

News Desk