मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून महाराष्ट्र व बिहार ही दोन्ही राज्य आमनेसामने आले आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांकडे दिला असतानाच बिहार सरकारनं या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र, आता या निर्णयाला राज्य सरकारनं विरोध केला आहे.
“सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात बिहार सरकारनं नियमांच्या विरोधात जाऊन काम केलं आहे. बिहार सरकारकडे केवळ झिरो एफआयआर दाखल करून घेण्याचा अधिकार होता. गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे पाठवायला हवा होता. मात्र, चौकशीचा कोणताही अधिकार नसताना बिहार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू केला,” असे राज्य सरकारने म्हटले आहे.
“या प्रकरणाचा बिहार पोलिसांनी तपास करणं हेच बेकायदेशीर असताना बिहार सरकार सीबीआय चौकशीची शिफारस कशी करू शकते. केंद्र सरकारनेही सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारून चूक केली आहे. या प्रकरणात बिहार सरकारनं सीबीआय चौकशीची शिफारस करणं योग्य नाही. केंद्र सरकारकडून ही शिफारस स्वीकारली जाणे केंद्र-राज्यांच्या संवैधानिक मर्यादांच्या विरोधात आहे, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.
We will abide by Supreme Court decision. Mumbai Police is investigating the case very professionally: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on being asked if Mumbai Police will hand over the #SushantSinghRajput case probe to CBI or there will be a parallel investigation pic.twitter.com/ITo2l7pQXo
— ANI (@ANI) August 8, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.