HW News Marathi
देश / विदेश

सुशांतची हत्या झालेली नाही, AIIMSकडून शिक्कामोर्तब

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला गेल्या काही महिन्यांपासून वारंवार नवनवी आश्चर्यकारक वळण मिळाली आहेत. सुशांतने आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत. मात्र, आता AIIMSरुग्णालयाच्या रिपोर्टमध्ये याबाबतचे स्पष्टीकरण आले आहे. AIIMSने CBI कडे पाठवलेल्या आपल्या अंतिम रिपोर्टमध्ये सुशांतची हत्या झाल्याचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला आहे. सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याचे या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आले आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अभिनेता सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण काय ?, याबाबत अनेक तर्कवितर्क गेल्या अनेक दिवसांमध्ये लढविले गेले आहेत. या प्रकरणात अनेकांची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान, AIIMSच्या टीमने आता आपला या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण करुन CBIकडे रिपोर्ट सुपूर्द केला आहे.मात्र, आता एम्स रुग्णालयाच्या रिपोर्टनंतर तरी या प्रकरणाला पूर्णविराम मिळणार का ? हा प्रश्न कायम आहे. AIIMSच्या रिपोर्टमध्ये समोर आलेली माहिती आणि CBIचा तपास या दोन्ही बाबी सर्वप्रथम पडताळून पहिल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, आता यापुढे हे प्रकरण नेमके कोणत्या दिशेने जात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंच्या अटकेनंतर जे.पी. नड्डांनी ट्विट करत दिले असे संकेत!

News Desk

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”- रामदास आठवले

News Desk

वयात आलेल्या मुलांना आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार – हायकोर्ट

News Desk