मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय, ईडीसह Narcotics Control Bureauम्हणजेच NCB देखील करत आहे. या प्रकरणातील ड्रग्स पुरवठ्याबाबतच्या धक्कादायक खुलाशानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती मोठ्या अडचणीत सापडली आहे. Narcotics Control Bureau कडून आता रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Narcotics Control Bureau registers a case against Rhea Chakraborty and others in #SushantSinghRajput's death https://t.co/oNs6L0KEnE
— ANI (@ANI) August 26, 2020
सुशांत सिंह आणि रिया चक्रवर्ती यांना ड्रग्जचा पुरवढा केला जात होता. याबाबतचे पुरावे ईडीला मिळाले आहेत. NCBचे संचालक राकेश अस्थाना यांनी हा दावा केला असून आता रिया चक्रवर्तीविरुद्ध कलम 20, 22, 27, 29 NDPS Act नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, याच्या संबंधित रियाचे ज्या व्हॉट्सअप चॅट्स समोर आल्या आहेत त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणाला वेगळे आणि गंभीर वळण मिळाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.