HW Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना मंत्रिमंडळात घेण्या बाबत सस्पेंन्स कायम 

मुंबई – स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशा बाबत मुख्यमंत्र्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. नारायण राणे हे आता एनडीएचे घटकपक्ष आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात घेण्या बाबत काय ते पुढे बघू असे सांगत त्यांनी आपले पत्ते खुले केले नाहीत. शिवाय राणेंनाही त्यातून संभ्रमात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    मात्र तो कधी होणार हे मात्र सांगण्याचे त्यांनी टाळले. राणें बाबतही त्यांनी अधिक बोलणे टाळले. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांना झुलत ठेवण्याची खेळी मुख्यमंत्र्यांकडून होत आहे अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.  काँग्रेसला सोडचिट्टी दिल्यानंतर स्वताचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना नारायण राणे यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी राणेंची वर्णी मंत्रिमंडळात लागेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने अजूनही आपले पत्ते खुले केले नसल्याने नारायण राणेंचे काय होणार या बाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Related posts

महाराष्ट्र विधानसभेकरिता योगी आदित्यनाथ यांची मुंबईत सभा

News Desk

आता वाहनांचे आरसी बुक पुन्हा ‘स्मार्ट’

News Desk

तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी | उदयनराजें

Prathmesh Gogari