HW News Marathi
महाराष्ट्र

स्वाभिमानी संघटनेकडून राज्यभरातील शेतकरी पुत्रांच्या साथीने एकरकमी FRP हॅशटॅग मोहिम..!

मुंबई। निती आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार कडुन FRP अर्थात ऊसदर हा तीन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला जात आहे.. यामुळे राज्यातील सर्वसामान्य शेतकरी अडचणीत येणार आहे व येणाऱ्या काळात शेतकरीपुत्रांचे भविष्य देखील अंधकारमय होणार आहे.. व्यापार धार्जिणे निर्णय घेणाऱ्या या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ही विचारण्याची आता वेळ आली आहे.. यासाठी स्वाभिमानीने मोठा लढा उभारला असुन याआधीच 12 सप्टेंबर पासुन मिस्डकॉल मोहिम देखील संघटनेकडून चालवली जात आहे.. या मोहिमेस शेतकरी व राज्यातील शेतकऱ्यांची तरूण मुलं यांकडुन प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे..

आता याच लढाईचा आणखी एक भाग म्हणून स्वाभिमानीचे मा.खासदार राजु शेट्टी यांच्या आदेशानुसार उद्या दि.25 सप्टेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने सायंकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP या हॅशटॅगचा ट्रेंड घेतला जाणार आहे.. या मोहिमेत राज्यातील सर्व राजकीय तसेच बिगर राजकीय संघटना यांनी या हॅशटॅग मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी केले आहे..

स्वाभिमानी व इतर कृषीविषयक संघटनांकडून आयोजित या केलेल्या या ट्रेंडमध्ये राज्यातील शेतकरीपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होवुन फेसबुक,ट्विटर तसेच इतर सर्व सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर #एकरकमी_FRP हा हॅशटॅग वापरून जास्तीत जास्त प्रमाणात आपली मते मांडावीत व या मोहिमेत सहभागी होत स्वाभिमानीच्या एकरकमी FRP च्या तुकडीकरणाविरोधातील मोहिमेस बळ द्यावे असे देखील बागल यावेळी बोलताना म्हणाले..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडणूक लढणार नाही! – संभाजीराजे

Aprna

कंगनाला मिळालेलं राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या – संजय राऊत

News Desk

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक, फसवणूक

News Desk