HW News Marathi
महाराष्ट्र

स्वच्छ सर्व्हेक्षणात सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून ‘महाराष्ट्र’ देशात अव्वल

नवी दिल्ली | ‘स्वच्छ सर्वेक्षण -२०१९’ मध्ये महाराष्ट्राने ४५ असे सर्वाधिक पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे, तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ चा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी (६ मार्च) नवी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण सोहळात पार पडला. हा सोहळात दिल्लीतील विज्ञान भवनात ‘स्वच्छ सर्व्हेक्षण-२०१९’ चे निकाल घोषित करण्यात आले. हे पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम १० पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.

महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिस-या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमास केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद मिश्रा उपस्थित होते.

राज्यातील २७ शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील २७ शहरे कचरा मुक्त ठरली असून यातील मूल, वैजापूर, वसई विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, खोपोली, जुन्नर, लोणावळा, सासवड, भोर, इंदापूर, संगमनेर, परळी, पंढरपूर, मंगळवेढा, महाबळेश्वर, पाचगणी, क-हाड, रत्नागिरी, मलकापूर, पन्हाळा, वडगाव, कोल्हापूर, गडहिंग्लज, विटा, तासगाव, कोरेगाव या शहरांचा समावेश आहे. कचरा मुक्तीसाठी या शहरांना ‘थ्री स्टार’ दर्जा देण्यात आला आहे. या सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण १९ पुरस्कार देण्यात आले. यापैकी १३ पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये कराड, लोणावळा, मूल, उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई, खोपोली, विटा, देवळाली-प्रवरा, इंदापूर, पोंभूर्णा , मौदा सीटी या शहरांचा समावेश आहे. एक लाख लोखसंख्या असलेल्या शहरामधून सातारा जिल्हयातील कराड, पुणे जिल्ह्यातील लोणावळा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे. ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूर, उमरेड, अंबाजोगाई व खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कार मिळाला आहे. २५ ते ५० हजार लोकसंख्या असलेल्या वीटा, देवळाली-प्रवरा व इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर २५ हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णा, मौदा, मलकापूर या शहरांनाही पश्चिम विभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार

१० लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्त्म प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. ३ ते १० लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठी चंद्रपूर शहराला गौरविण्यात आले, तर घन कचरा व्यवस्थापनात केलेल्या उल्लेखनीय कार्यायाठी लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.

पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात १७ व्या स्थानी

स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठी असलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबईला शहराला देण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील १ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या क्रमवारीत १७ वा क्रमांक मिळाला आहे. देशातील पाच शहरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामध्ये राजकोट, भिलाई नगर, विजयवाडा व गाजियाबाद या शहरांचा समावेश आहे. अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डास उत्तम स्वच्छ कॅन्टोनमेंट पुरस्कार देण्यात आला आहे.

राज्यातील २४ शहरे स्वच्छ रॅकिंगमध्ये पहिल्या शंभरमध्ये

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील ४२३ शहरांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या १०० शहरांत महाराष्ट्रातील २४ शहरांचा समावेश आहे. या शहरामध्ये नवी मुंबई (७), कोल्हापूर (१६), मीरा-भाईंदर (२७), चंद्रपूर (२९), वर्धा (३४), वसई-विरार (३६), पुणे (३७), लातूर (३८), सातारा (४५), पिंपरी-चिंचवड(५२), उदगीर (५३), सेालापूर (५४), बार्शी (५५), ठाणे (५७), नागपूर (५८), नांदेड-वाघाळा (६०), नाशिक (६७), अमरावती (७४), जळगाव (७६), कल्याण-डोबिंवली (७७), पनवेल (८६), अचलपूर (८९),बीड (९४) व यवतमाळ (९६) या शहरांचा समावेश आहे.

घन कचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरे

घन कचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये लातूर, खोपोली, इंदापूर व मलकापूर या शहरांचा समावेश आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावी कार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबई, चंद्रपूर, उमरेड व पोंभूर्णा या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संपत्तीसाठी भावांकडून वडील विजय शिवतारेंचा मानसिक छळ, मुलगी ममता शिवदीप लांडेंचा आरोप 

News Desk

बार मालकांकडून वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी संस्थेच्या नावे वळवले, EDचा मोठा खुलासा

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना जामीन मंजूर

Aprna