HW News Marathi
Covid-19

‘ब्लॅक फंगस’ला महामारी घोषित करा, औषधांचा साठाही उपलब्ध करा, सोनिया गांधींचं मोदींना पत्रं

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘म्युकरमायकोसिस’ आजाराच्या औषध तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी या आजाराचा सामना करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध केला जावा. तसेच, त्यांनी Liposomal Amphotericin-B च्या तुटवड्यावरून कारवाईची मागणी करत, अन्य आरोग्य विम्यांमध्ये म्युकरमायकोसिसला कवर करण्याची देखील विनंती केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

सोनिया गांधींनी म्हटले आहे की, “भारत सरकारने केवळ राज्यांना म्यूकरमायकोसिसला महामारी रोग अधिनियम अंतर्गत महामारी म्हणून घोषित करणयास सांगितले आहे. याचा अर्थ आहे की, याच्या उपचारासाठी आवश्यक औषधांचे पुरसे उत्पादन होईल आणि या औषधांचा पुरवठा देखील सुनिश्चित केला जाईल. याचबरोबर उपचारासाठी रूग्णांना हे औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल.”

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणतात, “मी समजू शकते की त्यांनी Liposomal Amphotericin-B म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी आवश्यक औषध आहे. बाजारात याचा तुटवडा आहे. हा आजार आयुष्मान भारत व बहुतांश आरोग्य विम्यांमध्ये समाविष्ट नाही. त्यांनी पुढे लिहिले की, म्युकरमायकोसिसग्रस्त अनेक रूग्णांना दिलासा मिळावा यासाठी, मी तुमच्याकडे याप्रकरणी तत्काळ केली जाण्याची आग्रहपूर्वक मागणी करत आहे. ”

 

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना विनामूल्य शिक्षण द्या – सोनिया गांधी

या लहानग्यांवर जे संकट ओढवले आहे त्यामधून सावरण्यास त्यांना मदत करणे आणि त्यांचे भवितव्य उज्ज्वल करणे हे देशावरील दायित्व आहे. त्यामुळे करोनामुळे ज्या मुलांवरील पालकांचे छत्र हरवले आहे त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये विनामूल्य शिक्षण द्यावे, अशी विनंती आपल्याला आधीच्या पत्राद्वारे करीत असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रामध्ये म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका – अजित पवार

News Desk

अयोध्या राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त काढणाऱ्या पुजाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

News Desk

महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणुका घेण्यास परवानगी, संजय राऊतांनी मानले केंद्र सरकारचे आभार

News Desk