HW News Marathi
महाराष्ट्र

मनसेच्या संतापानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘या’ वादग्रस्त संवादानंतर…

मुंबई | छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध असलेली तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा हा सेब टिव्हीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते. या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात गोकुळधामच्या सदस्यांनी मातृभाषेवरून एकमेकांमध्ये भांडताना दिसत आहे. ‘आपले गोकुलधाम कुठे आहे, मुंबईत आणि मुंबईची भाषा काय आहे? हिंदी,’ असा एक संवाद बापूजी चंपक लाल या भागामध्ये म्हणताना दिसले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असून सब टिव्हीने याबद्दल मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडबाबत तीव्र संताप व्यक्त केला.

आपले गोकुलधाम कुठे आहे. मुंबईत…आणि मुंबईची भाषा काय आहे? तर हिंदी. त्यामुळे आपण हिंदीतून सुविचार लिहितो. जर आपले गोकुलधाम चेन्नईत असते तर आपण तामिळ मधून सुविचार लिहिले असते. तसचे जर आपले गोकुलधाम अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये असते तर आपण इंग्रजीतून सुविचार लिहिले असते,” असा एक संवाद बापूजींनी या मालिकेतील भागात म्हटले.

‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता’ |अमेय खोपकर

अमेय खोपरकर यांनी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केली आहे. खोपकर म्हणाले की, ‘हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता’ अशा शब्दात अमेय खोपकर यांनी नाराजी व्यक्त केली. “मनसेचा विरोध याच नीच वृत्तीला आहे. मुंबईची भाषा मराठी हे यांना व्यवस्थित माहिती आहे, तरीही मालिकांमधून असा पद्धतशीर अपप्रचार सुरु असतो. यांची मस्ती उतरवावीच लागेल. या गुजराथी किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही यात काही चूक वाटत नाही, याचीच शरम वाटते,”

महाराष्ट्राची भाषाही मराठी | मालिकेचे दिग्दर्शकांची प्रतिक्रिया

हे प्रकरण तापल्याचे लक्षात आल्यानंतर या मालिकेचे दिग्दर्शक असित कुमार मोदी यांनीही ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. कुमार मोदी ट्वीटमध्ये म्हटले की, “मुंबईत महाराष्ट्रात आहे. आपल्या महाराष्ट्राची भाषाही मराठी आहे. यात मलाही जराशीही शंका नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीयही आहे. गुजरातीही आहे. सर्व भारतीय भाषांचा मला आदर आहे.”

मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी | चंपक चाचा

या प्रकरणावर मालिकेतील कलाकार चंपक चाचांनी पत्र लिहित जाहीर माफी मागितली आहे. चंपक चाचांनी पत्रात म्हटले की, “मुंबईतील भाषा हिंदी नसून मराठी आहे. त्याचा मलाही अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. त्याची माफीपण मागतो. तसेच यापुढे अशी चूक होणार नाही याची मी व्यक्तीश: दखल घेईन.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर…” भाजपचा शिवसेनेला थेट इशारा

News Desk

समन्वयातून सीमावाद सोडवावा! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Aprna

भरदिवसा काँग्रेस प्रवक्ता विकास चौधरींची गोळ्या झाडून हत्या

News Desk