मुंबई | राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या संकटापासून वाचण्यासाठी राज्य सरकारने टास्क फोर्सची निर्मिती केली. आणि आता याच टास्क फोर्समध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ एप्रिल कोविड टास्क फोर्सची घोषणा केली होती. कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच ही साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.