HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी तटकरेंची नियुक्ती

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी तटकरे यांची निवड केली असून तशा आशयाचे पत्र पक्षाचे जनरल सेक्रेटरी तारीक अन्वर यांनी सुनिल तटकरे आणि प्रदेश कार्यालयात गुरुवारी पाठवले.

गेली ४ वर्षे सुनिल तटकरे यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. तटकरे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली जात असल्याचे राष्ट्रवादीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

तटकरेंची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाले असून. राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष पदासाठी माजी अर्थमंत्री जयंत पाटील व दिलीप वळसे पाटील यांच्या पैकी एका नावाची वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पक्षात नविन प्रदेश अध्यक्ष कोण असणार याची घोषणा 29 एप्रिल रोजी पुण्यात होणा-या पक्षाच्या बैठकीत केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे! फडणवीसांच्या मध्यस्थीने घेतला निर्णय

News Desk

चंदू काका जगताप यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड : खा. अशोक चव्हाण

News Desk

रिलायन्सकडून मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत

swarit
मनोरंजन

महाराष्ट्राची महती सांगणारे “माझा महाराष्ट्र” गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

News Desk

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे “माझा महाराष्ट्र” हे गीत होय. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. ज्यात साधना सरगम, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध साउंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते असून शांतनू रोडे यांनी या गीताचे दिग्दर्शन केले आहे. या गीताचे छायांकन आशुतोष आपटे यांचे आहे, तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले आहे.

मूळचे नागपूरचे असलेले अभिजीत जोशी यांनी या आधी अनेक मराठी सिनेमांसाठी गीतकार- संगीतकार म्हणून काम केले आहे. यामध्ये “हरी ओम विठ्ठला”, “अगडबंब”, “कामापुरता विमा”, “सुपारी पालखी”, “जयजयकार”, “लक्ष्मी येई घरा”, “हर हर महादेव” या चित्रपटांचा समावेश आहे. शंभरहुन अधिक अल्बम्स, जिंगल्स आणि चित्रपट मिळून तीनशेहुन अधिक गाणी अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे.

सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांबरोबर अभिजीत यांनी काम केले आहे. शासनाच्या अनेक योजनांवर आधारित गाणीही अभिजीत यांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आणि अमृता फडणवीस यांचा समावेश असलेले “रिव्हर मार्च” हे सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले गाणे देखील अभिजीत जोशी यांच्या नावावर आहे.

Related posts

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

Atul Chavan

ऋषी कपूर यांच्या निधनाने निखळ आनंद देणारे हसतमुख, हरहुन्नरी, सदाबहार व्यक्तीमत्वे हरपले !

News Desk

Mahatma Gandhi Death Anniversary | महात्मा गांधींचे काही अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे

News Desk