मुंबई | अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळ संथपणे गुजरातच्या दिशेने जात आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला या वादळाचा चांगलाच तडाखा बसला असून, आज (१७ मे) दिवसभर मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं.मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून, यापैकी एका जहाजावर २७३, तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं आहे.
मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर २७३ जण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याचे समजते. वादळामुळे ही बोट भरकटलीय. बोटीने नांगर टाकलेल्या नसल्याने ती वादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. ही बोट बंदरामधील तसेच समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
भारतीय नौदलाने आयएनएस कोच्चीच्या मदतीने या बोटीवरील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. त्याचप्रमाणे मुंबईच्या किनारपट्टीपासून ७० किमीवर असणाऱ्या बॉम्बे हाय या तेल उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पालाही ही बोट धडकण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने या बोटीला शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.
तसेच दुसरीकडे मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज भरकटलं असून त्यावर १३७ जण आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.
#CycloneTauktae: Indian Navy Search & Rescue.
In response to another SOS received from Barge 'GAL Constructor' with 137 people onboard about 8NM from Mumbai INS Kolkata has been sailed with despatch to render assistance. pic.twitter.com/owR83jahsQ
— All India Radio News (@airnewsalerts) May 17, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.