मुंबई | तौक्ते चक्रीवादळ निघून गेल्यानंतरही मुंबईत आजही पावसाची शक्यता आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांसह आजुबाजूच्या परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. अधूनमधून पावसाच्या तुरळक सरीही बरसत आहेत. याशिवाय, वारेही नेहमीपेक्षा वेगाने वाहत आहेत. वातावरणाचा एकूणच नूर पाहता मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे काल दिवसभर मुंबई, उपनगर आणि ठाण्याच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. आजही अशाचप्रकारेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
#WATCH | Maharashtra: Trees uprooted in Mumbai's Ballard Estate area due to heavy rain and wind.#CycloneTaukte pic.twitter.com/YuQuAcCApd
— ANI (@ANI) May 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.