HW News Marathi
Covid-19

अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण  

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात आणि मुंबईत देखील आकडा वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. मुंबईसह देशभरात ३ ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. २७ जुलैला सकाळी १०.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रयोगशाळांचे उद्घाटन करणार आहेत. या अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना संख्या आटोक्यात आणण्यासाठी मदत मिळणार आहे.

मुंबईसह देशात कोलकाता आणि नोयडा येथेही या अत्याधुनिक कोविड प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी आयसीएमआरच्या संशोधन संस्थांची निवड करण्यात आली आहे. या सुविधेमुळे चाचणी करण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी होणार आहे. तसेच प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांचा बाहेरच्या वातावरणाशी संपर्क कमी होऊन संसर्ग वाढण्याचा धोकाही कमी होणार आहे.

“कोविड १९ च्या साथीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार परस्पर समन्वयातून महत्त्वाची पावले उचलत आहेत. याचा भाग म्हणून कोरोना चाचणीच्या सुविधांमध्ये काही अत्याधुनिक सुविधांचा समावेश केला जात आहे. यासाठी आयसीएमआर देशभरात तीन ठिकाणी अशा अत्याधुनिक सुविधांची व्यवस्था करत आहे. यात मुंबई, कोलकाता आणि नोयडातील आयसीएमआर संस्थांचा समावेश आहे.” असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk

अमित ठाकरेंनी घेतली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट

News Desk

आवाजावरून कोरोना चाचणी करणे आता होणार शक्य !

News Desk