HW News Marathi
देश / विदेश

छत्रपती आणि ठाकरे घराण्यातील ते नातं आजही ! राज ठाकरेंच्या भेटीनंतर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

मुंबई । मराठा आरक्षणावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार संभाजीराजे देखील पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. याच पार्श्वभूमीवर, संभाजीराजे यांनी गुरुवारी (२७ मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संभाजीराजे भोसले यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या मैत्रीच्या आठवणी जागवल्या आहेत.

राज ठाकरेंच्या भेटींनंतर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “राज ठाकरेंची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जात-पात मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं या मताचे ते आहेत. माझ्या भूमिकेला ते समर्थन देखील करतात. माझे पणजोबा राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे जिवलग मित्र होते. छत्रपती घराण्याचं आणि ठाकरे घराण्याचं ते नातं आजही आहे. शिवाय किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन या मुद्द्यावर देखील आमचं एकमत आहे. त्यामुळे त्याबाबत देखील आमची चर्चा झाली”, असे संभाजीराजे म्हणाले.

मराठा आरक्षणावर मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची !

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण देणारा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे आरक्षण कसे मिळवता येईल याचसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, शरद पवार यांची भेट घेतली तर दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मी माझ्या समाजासाठी सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांची भेट घेत आहे. मराठा समाज हा महाराष्ट्रात प्रमुख समाज आहे. त्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याची जबाबदारी माझीच नाही तर सर्व पक्षांची आहे”, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार, बांग्लादेशची क्रिकेट टीम थोडक्यात बचावली

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk

Tarun Sagar Died |तरुण सागर यांचे निधन, पंतप्रधनांनी ट्विटरद्वारे वाहिली श्रद्धांजली

News Desk